Sun, Sep 20, 2020 09:55होमपेज › Soneri › 'फक्त एकदा माझ्या गर्लफ्रेंडला भेटवा', सोनू सूदला बॉयफ्रेंडची विनंती 

'फक्त एकदा माझ्या गर्लफ्रेंडला भेटवा'

Last Updated: May 27 2020 4:03PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी सोनू सूद सुपरहिरो बनला आहे. सोशल मीडियावर सोनूचे कौतुक देखील होत आहे. आपल्या घरी पोहोचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि अडचणींचा सामना कराव्या लागणाऱ्या प्रवासी मजुरांना सोनू सुद मदत करत आहे. ते ट्विटरवरून सोनू सुदकडे मदत मागत आहेत. सोनू देखील त्यांच्या मदतीसाठी पुढे धावला आहे. याआधी एका व्यक्तीने आपली व्यथा मांडून पोलिस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत असल्याचे सोनूला ट्विटवरून म्हटले होते. तर आणखी एका व्यक्तीने आम्हाला बिहार पाठवा, आम्ही अडकलो आहोत, अशी विनंती सोनूकडे केली होती. आता एका व्यक्तीने अनोखी मागणी सोनू सूदकडे केली आहे. या मागणीवरून सोनूने त्या व्यक्तीला काय उत्तर दिले पाहा. 

ट्विटरवरून एका व्यक्तीने सोनू सूदला म्हटले की ''भैय्या, एकदा गर्लफ्रेंडची भेट घालून द्या...बिहारलाच जायचं आहे.'' 

यावर सोनू सूदने रोचक अंदाजात उत्तर दिले. त्याने म्हटले की, ''थोडे दिवस दूर राहून बघ माझ्या भावा, खऱ्या प्रेमाचीदेखील परीक्षा होते.'' 

सोनूचे हे रोचक उत्तर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनाही आवडलं. 
 

 "