मुंबई : पुढारी ऑनलाईन
प्रेम व्हायला कुठलेही कारण लागत नाही. तेथे धर्म कधीच आड येत नाही. प्रेमावर आधारित अशीच एक वेबसीरीज ८ मार्च २०२१ रोजी येत असून ती अल्ट बालाजीवर रिलीज होईल. दोन महिलांची प्रेम कहाणी 'द मॅरिड वूमन' या वेब सीरीजमधून येत आहे. दोन विवाहित महिलांची कहाणी असलेल्या या वेबसीरीजमध्ये एकता कपूरने रोमान्सचा तडका लावला आहे.
कशाप्रकारे दोन विवाहित महिला आपल्या आयुष्यात एकट्या पडतात. प्रेमाच्या शोधात भटकतात…गुंतत...स्वत: पासून दूर होतात. मग दोघींची भेट होते. प्रेम होतं..पुढे काय होतं, हे सीरीज पाहिल्यानंतर समजेल. चित्रपटातील- 'I think आप बाउंड्री क्रॉस कर रहे हैं', 'जब तक आप क्रॉस न करें, तो पता कैसे चलेगा. बाउंड्री है कहां' हा डायलॉग प्रेक्षकांना भावत आहे. एका पुस्तकावर आधारित ही वेब सीरीज असून ८ मार्चला रिलीज होईल. मुख्य भूमिकेत रिध्दी डोग्रा आणि मोनिका डोग्रा आहेत.