Mon, Aug 10, 2020 21:53होमपेज › Soneri › सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

Last Updated: Jul 01 2020 2:43PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संशय व्यक्त करण्यात आला होता की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट झाले की, सुशांतने आत्महत्या केली होती. आता सुशांतचा व्हिसेरा रिपोर्टदेखील आला आहे. विसेरा रिपोर्टमध्ये मृताच्या पोटातून सँपल घेतले जातात. यावरून समजते की, त्याने मादक किंवा विषारी पदार्थ घेतले होते की नाही. 

काय म्हटले आहे व्हिसेरा रिपोर्टमध्ये?

सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टमनंतर व्हिसेरा सँपल मुंबईतील जे जे हॉस्पिटल पाठवण्यात आले. व्हिसेरा रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, सुशांतच्या शरीरात कोणताही मादक किंवा विषारी पदार्थ आढळलेला नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटले होते की, सुशांतचा मृत्यू श्वास घुटमळल्याने झाला आहे आणि त्याच्या शरीरावर कुठेही कोणत्याही प्रकारचे स्ट्रगल मार्क्स नाही. या आधारावर मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.  

सुशांतने मुंबई येथील राहत्या घरात १४ जून रोजी गळफास घेऊन  आत्महत्या केली होती. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडचे काही लोक आणि त्याचे फॅन्स आरोप करू लागले की, फिल्म इंडस्ट्रीमधील गटबाजी आणि नेपोटिज्मने सुशांतचा बळी घेतला आहे. त्यामुळे सुशांत डिप्रेशनमध्ये  आला आणि त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेक लोकांची चौकशी केली आणि तपास अद्याप सुरू आहे.