नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज ३५ वा जन्मदिवस आहे. १४ जून, २०२० रोजी बांद्रा येथील राहत्या फ्लॅटमध्ये सुशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या जन्मदिनाच्या औचित्याने फॅन्स आणि त्याची बहिण श्वेता सिंह किर्ती भावूक झाले आहेत. श्वेताने एक इमोशनल पोस्ट लिहून सुशांतच्य़ा आठवणीत एक कोलाज शेअर केले आहे.
श्वेता सिंह कीर्तिने थ्रो बॅक फोटोचे एक कोलाज शेअर केले आहे. या फोटोमध्ये सुशांत सिंह राजपूत, त्याची बहिण श्वेता सिंह कीर्ति, त्याची भाची आणि कुटुंबातील अन्य सदस्य आहेत. या कोलाजमध्ये श्वेता आणि सुशांतच्या बालपणीचा एक फोटो आहे. त्याचबरोबर, श्वेताने एक इमोशनल नोटच्या माध्यमातून सांगितलं आहे की, सुशांत तिच्या जीवनाचा एक भाग आहे. श्वेता सिंह कीर्तिने लिहिलंय,"लव्ह यू भाई. तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस आणि नेहमी राहशील.."
श्वेताच्या या पोस्टवर सुशांतचे फॅन्स कमेंट करत त्याच्या आठवणी जागवत आहेत. श्वेता सिंह कीर्तिने आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले की भावाच्या जन्मदिनी तिचे एक स्वप्न पूर्ण होत आहे. एस्ट्रोफिजिक्सच्या शिक्षणासाठी सुशांत सिंह राजपूतच्या नावे स्कॉलरशीप दिली जाईल.
सुशांत सिंह राजपूतच्या नावे स्कॉलरशीप
श्वेता सिंह कीर्तिने लिहिलंय,"मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, भावाच्य़ा ३५ व्या जन्मदिनी त्याचे स्वप्न पूर्ण करम्यासाठी एक पाऊल पुढे वाढवले आहे. यूसी बर्कले (City in California) मध्ये सुशांत सिंह राजपूत मेमोरियल फंड ३५०० डॉलर देईल. बर्कलेमध्ये (Berkeley) एस्ट्रोफिजिक्समध्ये आवड असणारा कोणताही विद्यार्थी या फंडसाठी ॲप्लाय करू शकतो."