Thu, Oct 29, 2020 06:53होमपेज › Soneri › HBD : साध्या पेहरावातील गोड चेहऱ्याची दक्षिणेतील किर्ती 

HBD : सहज अभिनयाने लाखोंच्या हृदयात स्‍थान बनवणारी दक्षिणेची किर्ती 

Last Updated: Oct 17 2020 3:50PM
पुढारी ऑनलाईन 

उत्‍तम अभिनयासाठी राष्‍ट्रीय पुरस्‍कार पटकावणाऱ्या दक्षिण चित्रपट सृष्‍टीतील गोड चेहऱ्याच्या किर्ती सुरेशचा (Keerthy Suresh) चा आज (१७ ऑक्‍टोंर) वाढदिवस आहे. किर्ती ही इडु एन्ना मायम, महंती, सरकार यासारख्या दक्षिणेतील हिट चित्रपटांमध्ये झळकली आहे. किर्ती सुरेशचे वडील सुरेश कुमार आणि आई मेनका हे दोघेही चित्रपटसृष्‍टीशी जोडले गेले आहेत. किर्तीने आपल्‍या करिअरची सुरूवात बाल कलाकार म्‍हणून केली होती. चला तर मग जाणुन घेउयात किर्ती आणि तीच्या प्रवासाविषयी...

किर्तीचा जन्म १७ ऑक्‍टोबर १९९२ मध्ये झाला. किर्तीने आपल्‍या भारतीय पेहरावातून फक्‍त दक्षिण भारतचं नव्हे तर, देशात स्‍वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे. किर्तीने २००० मध्ये पायलट्स चित्रपटातून बाल कलाकार म्‍हणून डेब्‍यू केला होता. फॅशन डिझाईनचे शिक्षण घेणारी किर्तीने २०१३ मध्ये आलेल्‍या मल्‍याळम चित्रपट गीतांजलीमध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. यानंतर किर्तीने केंव्हाही मागे वळून पाहिले नाही. 

इंस्‍टाग्रामवर किर्तीचे ६.५ मिलियन फॉलोवर्स आहेत. किर्तीला अनेक टीव्ही शोजमध्ये पाहण्यात आले आहे. मुख्य भूमीकेसोबतच किर्तीने अनेक चित्रपटांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवली आहे. किर्तीला सर्वात लोकप्रिय तमिळ अभिनेतत्री म्‍हणून सन्मानित करण्यात आले आहे. 

सोशल मीडियावर नेहमी ॲक्‍टिव्ह असणारी किर्ती सुरेश तीच्या इंस्‍टाग्राम अकाउंटवर जास्‍त बोल्‍ड फोटो पोस्‍ट करत नाही. तीचे अधिकतर फोटो हे साडी किेंवा सूटमधील पेहरावातलेचं असल्‍याचे दिसून येतात. 'महनती' या चित्रपटातून किर्तीला खूप लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट तेलुगु अभिनेत्री सावित्रीच्या जीवनावर आधारित होती. या चित्रपटात किर्तीने सावित्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्‍यावर ब्‍लॉकबास्‍टर हिट ठरला होता. 

किर्तीने मुख्य अभिनेत्री म्‍हणून २०१३ मध्ये आलेल्‍या हॉरर चित्रपट 'गीतांजलि' आपला मल्‍याळम डेब्‍यू केला होता. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसली होती. यानंतर ती तमिळ, तेलगू, मल्‍याळम चित्रपटांमध्ये काम करत आहे. किर्तीने आपल्‍या निरागस सौदर्याने लाखो लोकांच्या हद्यात आपले स्‍थान बनवले आहे. 

 "