Sat, Aug 08, 2020 11:44होमपेज › Soneri › सुशांतच्या एक्स मॅनेजरसोबत रिलेशनशीप? सुरज पंचोलीने सोडले मौन 

सुशांतच्या एक्स मॅनेजरसोबत रिलेशनशीप? सुरज पंचोलीने सोडले मौन 

Last Updated: Jul 04 2020 4:01PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण चित्रपट इंडस्ट्रीला धक्का बसला. याप्रकरणी सध्या मुंबई पोलिस तपास करत आहेत. आतापर्यंत अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. यादरम्यान, अभिनेता सूरज पंचोली सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सलियान आणि सूरज पंचोली रिलेशनशीपमध्ये होते, असे सोशल मीडियावर काही युजर्सनी म्हटले. यावरून सूरज पंचोली ट्रोल झाला. आता यावर सुरजने मौन सोडले असून तो दिशा सलियानबद्दल काय म्हणाला पाहा. 

काही ट्विटरनी युजर्स अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सलियान आणि सुरज पंचोली रिलेशनशीपमध्ये होते, असे म्हटले. दिशा सलियानने सुशांतच्या आत्महत्येपूर्वी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. 

एका वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, सूरज पंचोलीने त्याच्यावरील आरोप फेटाळले असून त्याच्याबद्दल अफवा पसरत असल्याचे म्हटले आहे. या सर्व गोष्टी घृणास्पद, अयोग्य आणि असंवेदनशील असल्याचे त्याने म्हटले आहे. दिशा सलियान कोण आहे, हेदेखील माहिती नाही. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतरच मला दिशाबद्दल समजले, असा दावा त्याने केला. त्याचबरोबर, दिशाला आयुष्यात कधीही भेटलो नसल्याचे सूरज म्हणाला. 

सुूरज म्हणाला, सुशांत सिंहने आत्महत्या केल्यानंतर त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाबद्दल समजलं. कधी दिशासोबत बोलणे झाले नव्हते आणि ती कशी दिसत होती, हेदेखील त्याला माहिती नसल्याचा दावा सूरजने केला. 

सुूरज पंचोली लोकांना उद्देशून म्हणाला की, त्या मुलीच्या परिवारातील तिच्या भाऊ-बहिणींबद्दल विचार करा. ते कोणत्या परिस्थितीतून जात असतील? त्याला या गोष्टीचे दु:ख नाही की, लोक त्याच्याबद्दल काय काय बोलत आहेत. परंतु, याचे दु:ख अधिक आहे की, जी या जगात नाही, तिच्याबद्दलदेखील लोक बोलत आहेत.