Thu, Oct 29, 2020 04:24होमपेज › Soneri › लक्षवेधी रुपातील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?(See Pic)

लक्षवेधी रुपातील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?(See Pic)

Last Updated: Oct 18 2020 12:04PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत नवा उपक्रम राबवला आहे. आणि तिने सोशल मीडियावर आपले खास फोटो शेअर केले. तेजस्विनीच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी एका मराठी अभिनेत्रीने दुर्गारूप धारण केले आहे. तिच्या या रूपामध्ये तिला ओळखणे देखील अशक्य झाले आहे.

शारदीय नवरात्रौत्सवला नुकतीच सुरूवात झाली आहे. प्रत्येक स्त्री मध्ये दुर्गारूप पाहायला मिळते. दुर्गा, पार्वती, अन्नपूर्णा अशा विविध रुपांमध्ये दिसणारी 'ती' सर्वशक्तीशाली आहे. मुळात स्त्री ही कोणत्याही रुपात आदिशक्तीचंच एक रुप असते हेच सांगणारी आणि छायाचित्रांच्या रुपातून हे उलगडणारे रूप अभिनेत्री रूपाली भोसले हिने धारण केले आहे. 

dinsta

नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग राखाडी असल्याने रुपालीने राखाडी रंगाची साडी परिधान केली आहे. दुर्गा देवीची शक्ती ही प्रत्येक महिलेत असते असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पितांबर रंग परिधान करून रूपालीने कडक लक्ष्मीचे रूप धारण केले आहे.

dinsta

dinsta

हे रूप शेअर करताना रूपालीने '' स्वत: च्या आत धैर्य जागृत करणारी प्रत्येक स्त्री दुर्गा आहे. स्वतःमध्ये परिवर्तन जागृत करणारी प्रत्येक स्त्री काली आहे. आपल्यात भक्ती जागृत करणारी प्रत्येक स्त्री पार्वती आहे. स्वत: च्या अंतःकरणास जागृत करणारी प्रत्येक स्त्री म्हणजे अन्नापूर्णा. प्रत्येक महिला शक्ती आहे.'' असे म्हटले आहे. 

dinsta

dinsta

dinsta

 "