Thu, Jan 28, 2021 03:32मल्याळी सिनेमा ‘जलिकट्टू’ ऑस्करला जाणार!

Last Updated: Nov 25 2020 5:39PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

मल्याळम सिनेमा ‘जलिकट्टू’ला भारताकडून ऑस्करला पाठविण्यासाठी निवडण्यात आलं आहे. ९३ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी २७ चित्रपटांमधून भारताकडून अधिकृतरीतरित्या पाठविल्या जाणाऱ्या सिनेमामध्ये ‘जलिकट्टू’ने बाजी मारली आहे. आंतराष्ट्रीय फिचर फिल्म या विभागासाठी हा चित्रपट पाठवला जाणार आहे.   

या चित्रपटाचे कौतुक करत ज्युरी बोर्डाचे सदस्य तथा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहुल रावेल म्हणाले, चित्रपटाचा विषय आणि त्यांच्या गुणवत्तेमुळे या चित्रपटाला ऑस्करला जाण्यासाठी संधी देण्यात आली. यावेळी राहुल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जोश पेलिसरी यांचे विशेष कौतुक केले. शकुंतला देवी, गुंजन सक्सेना, छपाक, गुलाबो सिताबो, एके व्हर्सेस एके, भोंसले, छलांग, चेक पोस्ट, बुलबूल, कामयाब, द स्काय इज पिंक, चिंटू का बर्थडे यासारखे चित्रपटाच्या स्पर्धेतून जलिकुट्टीची निवड करण्यात आली आहे. 

ऑस्करला जाण्यासाठी जलिकुट्टीची निवड झाल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जोश पेलिसरी म्हणाले, मानवी प्रवृत्तीची अत्यंत वाईट बाजूवर या चित्रपटात बोट ठेवण्यात आले आहे. आपण प्राण्यांपेक्षाही वाईट आहोत हे या सिनेमामध्ये ठळकपणे दाखविण्यात आलं आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण अत्यंत चांगल्यापद्धतीनं करण्यात आलं आहे. यामध्ये आश्चर्यकारक वाटणारी काही दृष्य चित्रित करण्यात आली आहेत. त्यामुळे हा सिनेमा पाहण्याजोगा झाला आहे. मानव आणि प्राण्यांमधील संबध दाखविण्याचा एक प्रयत्न यामधून करण्यात आला आहे. सिनेमा पाहून बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षकाला हा सिनेमा हालवून टाकेल. प्रत्येकजण भावनिक पातळीवर आपल्या प्रवृत्तीची पडताळी करेल, असे मत दिग्दर्शक जोश पेलिसरी यांनी यावेळी व्यक्त केले.