Thu, Jan 28, 2021 05:24
'केजीएफ-२' फेम यशची अभिनेत्री श्रीनिधि शेट्टीबद्दल माहिती आहे का?  

Last Updated: Jan 12 2021 6:02PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बहुचर्चित चित्रपट 'केजीएफ चॅप्टर-२' (KGF Chapter 2 Teaser) चा टीझर रिलीज झाला आहे. खास म्हणजे दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच टीझर रिलीज झाला. यामध्ये कन्नड स्टार यशचा सुपर स्वॅग पाहायला मिळत आहे. सुपरस्टार यशच्या वाढदिवसादिवशी सिनेमाचा टीझर लाँच करणार होते. मात्र त्यांनी एक दिवस अगोदर केलं आहे. या टीझरची चाहते मनापासून वाट पाहत आहेत. या टीझरला होमबेल फिल्म्सने यूट्यूबवर रिलीज केलं आहे. टीझर रिलाज होताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रीनिधि शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. 

श्रीनिधिने कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या फॅशन शोमध्ये भाग घेतला होता. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करू लागली. 

तिला मॉडेल व्हायचे होते. म्हणून तिने आपली नोकरी सोडली. 

पुढे तिने विविध सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. 

२ डिसेंबर, २०१६ मध्ये तिने पोलंडमध्ये आयोजित यामाहा फासीनो मिस दिवा सुपरनॅशनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. 

तिने MISS SUPRANATIONAL चा किताब मिळवला. 

तिला २०१६ मध्ये MISS SUPRANATIONAL ASIA AND OCEANIA चा किताबदेखील मिळवला. 

हा किताब जिंकल्यानंतर तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर मिळाल्या. 

तिने २०१८ मध्ये कन्नड चित्रपट के जी एफ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 

या चित्रपटामध्ये यश मुख्य भूमिकेत होता. 

आता केजीएफ चॅप्टर २ लवकरच रिलीज होणार आहे. यामध्ये यशसोबत श्रीनिधीची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Dutt), यश (Yash), रवीना टंडन (Raveena Tandon) प्रकाश राज असे अनेक कलाकार दिसणार आहेत.