Thu, Oct 29, 2020 07:53होमपेज › Soneri › आता आमिर खानच्या मुलाने घेतला 'हा' निर्णय 

आता आमिर खानच्या मुलाने घेतला 'हा' निर्णय 

Last Updated: Oct 17 2020 1:50PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सने एन्ट्री करण्याचा ट्रेंड आला आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या मुला- मुलींनी यात सहभाग घेवून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सध्या अशाच एका गाजलेला स्टार आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  

अधिक वाचा : 'कंगना राणावत विरोधात एफआयआर दाखल करा'

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जुनैद खान ‘इश्क’ या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक यांनी ‘इश्क’ या चित्रपटाची पटकथा आणि कास्टिंगवर काम सुरु केलेले आहे. तर या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. 

अधिक वाचा :कंगाल होण्याच्या वृत्तावर आदित्य नारायण म्हणतो...

जुनैद खान सध्या जर्मनीतील एका महाविद्यालयात अभिनयाचे शिक्षण घेत आहे. यावरून जुनैदला अभिनयाची खूपच आवड असल्याचे दिसते. जुनैदने अनेक इंग्रजी आणि जर्मन भाषेतील नाटकांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्याला दिग्दर्शन करण्याची  आवड आहे. आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटात जुनैदने राजकुमार हिरानीसोबत सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी स्विकारली होती.

Details about Aamir Khan's son Junaid Khan's acting debut | Filmfare.com

 "