Fri, Oct 02, 2020 01:23होमपेज › Soneri › जान्हवीच्या ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटावर हवाई दलाचा आक्षेप

जान्हवीच्या ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटावर हवाई दलाचा आक्षेप

Last Updated: Aug 12 2020 6:41PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' हा चित्रपट आज (दि. १२) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. १९९९च्या कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. या ची निर्मिती करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यावर वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात भारतीय हवाई दलाची नकारात्मक प्रतिमा दाखवविण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. खुद्द हवाई दलाकडूनच या विषयी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच हे पत्र नेटफ्लिक्स आणि धर्मा प्रॉडक्शन यांनाही पाठविले आहे.

या पत्रात लिहिले आहे की, ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ चित्रपट पहिल्यानंतर या चित्रपटातील काही दृष्य, संवाद आणि ट्रेलरमधील काही भाग भारतीय हवाई दलाची नकारात्मक प्रतिमा तयार करत असल्याचे निर्दर्शनास आले आहे. चित्रटातील मुख्य पात्राचे म्हणजेच फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांचे महत्व वाढवून दाखवण्यासाठी धर्मा प्रोडक्शनने काही घटना चुकीच्या पद्धतीने चित्रीत केल्या आहेत. भारतीय हवाई दलामध्ये महिलांना देण्यात येणाऱ्या वागणूकीबद्दल चुकीचा संदेश यातून दिला जात आहे.

गुंजन सक्सेना फिल्म कारगिल युद्धामध्ये सामील झालेल्या पहिल्या महिला पायलटवर आधारित आहे. १९९९ च्या युद्धात शौर्य गाजवल्यानंतर त्यांना शौर्य वीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, भारतीय सैन्यात लिंगाच्या आधारे भेदभाव केला जात नाही. सर्वांना समान संधी दिली जाते. तिन्ही सैन्य दलांपैकी हवाई दलाने प्रथम वैद्यकीय शाखेबरोबरच इतर विभागात महिला अधिका-यांची नेमणूक केली आहे.

 "