Fri, Oct 02, 2020 01:42होमपेज › Soneri › बेताल वक्तव्य करणाऱ्या केआरकेला मोठा झटका

बेताल वक्तव्य करणाऱ्या केआरकेला मोठा झटका

Last Updated: May 22 2020 11:13AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बिग बॉसचा माजी स्पर्धक कमाल राशिद खान (केआरके) विरोधात मुंबईतील बांद्रा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी केस दाखल करण्यात आली आहे. युवासेनेच्या कोअर कमिटीच्या एका सदस्याने केआरकेविरोधात बुधवारी तक्रार दाखल केली होती. 

ऋषी कपूर रूग्णालयात दाखल झाल्यानंतर केआरकेने लिहिले होते-'ऋषी कपूर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर बरे होऊन परत यावे, जाऊ नये. दारूची दुकाने दोन-तीन दिवसांनंतर उघडणार आहे.' 

केआरकेने नंतर एका ट्विटमध्ये लिहिलं होतं की- 'मला माहित होतं की, इरफान आणि ऋषी कपूर जातील. मला हेदेखील माहिती आहे की, पुढचा क्रमांक कुणाचा आहे.' 

अभिनेता इरफान खानचे २९ एप्रिल आणि ऋषी कपूर यांचे ३० एप्रिलला निधन झाले होते. याप्रकरणी अद्याप केआरकेला अटक झालेली नाही. 

दरम्यान, केआरकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आणखी एक ट्विट करत म्हटले होते की,  आज माझ्या जवळच्या मित्राचे इरफान खानचे कोरोनाने निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो! आरआयपी! हे खूपच भयावह आहे. जणू माझादेखील नंबर आला आहे? माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, जर मी मेलो तर आरआयपी ट्विट करायला कृपया विसरू नका.'

 "