Wed, May 19, 2021 05:10होमपेज › Soneri › डान्सर सना खानचा मौलवीशी गुपचुप निकाह!

डान्सर सना खानचा मौलवीशी गुपचुप निकाह!

Last Updated: Nov 22 2020 8:53PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर सना खान हिने गुजरातमधील मौलवी मुफ्ती अनस सईद यांच्याशी गुपचुप निकाह केल्याचे समोर आले आहे. तिने स्वत:च्या इन्सटाग्राम अकाउंटवरुन ही माहिती शेअर केली आहे. सोबत सना खानने लग्नानंतरचा फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत तिने आपण मौलवीशी लग्न केल्याने आता एक सुखी संसार करणार असून बॉलिवूड सोडल्याचे जाहीर केले आहे. 

 

सना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती मौलवी मुफ्ती अनस सोबत दिसून येत आहे. अनस यांनी पांढऱ्या रंगाची शेरवानी परीधान केली आहे, तर त्यांच्या शेजारी बसलेल्या सनाने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोत नवदाम्पंत्य अगदी शोभून दिसत आहेत. हा फोटो शनिवारी (दि. २१) व्हायरल झाला होता. यानंतर तिने एक व्हिडिओ ही शेअर केला आहे. शेअर करताना तिने सोबत लिहले आहे की, ‘अल्लाहसाठी आम्ही एक दुसऱ्यावर प्रेम केले, अल्लाहसाठी लग्न केले आहे आणि या जगात अल्लाह आम्हाला सोबत ठेवेल आणि पुन्हा जन्नतमध्ये दोघांना एकत्र भेट घालून देईल’. 

सना खान हिचे पती एक मौलवी आहेत. ते सुरत येथे रहात असून या ठिकाणी मुस्लीम धर्मगुरु म्हणून त्यांचे मोठे प्रस्त आहे. शिवाय ते एक बिझनेसमनही आहेत. सना खान हिचे या आधी डान्सर, कोरिओग्राफर मेल्विन लुईस याच्या सोबत प्रेमसंबध होते. काही दिवसांपूर्वी आपले ब्रेकअप झाले असून यामुळे डिप्रेशनमध्ये गेल्याचे तिने सांगितले होते. सनाने ‘जय हो’, ‘धन धना धन गोल’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती बिग बॉसची स्पर्धकही राहिली आहे.

लग्नानंतर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच पुढील आयुष्यासाठी आशिर्वादही मागितले आहे. आतापर्यंत बॉलिवूडसारख्या शोबाज इंडस्ट्रीत राहून काम केले. आता आनंदमय संसारिक जीवन घालवू इच्छित आहे, असं सनाने म्हटलंय. त्याचबरोबर तिने यापुढे बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचेही जाहीर केलंय. 

असो या निमित्ताने तिचे चाहते ती बॉलिवूडमध्ये पुन्हा दिसणार नसल्याने नाराज होतील. त्यांना आता हे दुख: पचवावे लागेल. पण, सना खान यानंतर खरंच बॉलिवूडमध्ये परतेल की नाही हे पहावे लागणार आहे.