Mon, Apr 12, 2021 02:32
'Billionaire' च्या यादीत किम कर्दाशियाचा समावेश, इतक्या संपत्तीची मालकीण

Last Updated: Apr 07 2021 1:56PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

मॉडल, अभिनेत्री किम कर्दाश‍ियां  अध‍िकृतरित्या बिलिन‍ियर बनली आहे. फोर्ब्सने जगातील बिल‍िन‍ियर्सची यादी जारी केली. या यादीत तिच्‍या नावाचाही समावेश आहे. फोर्ब्स मॅगजीननुसार, टेलीव्हिजन शोज आणि एंडोर्समेंट डील्स शिवाय किम कर्दाशियांच्या दोन मोठ्या बिजनेसने तिला बिलिन‍ियर होण्यासाठी मदत केली.

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, किम एक बिलियन म्हणजेच भारतीय चलनानुसार, १०० कोटींची संपत्तीची माल‍किण आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये तिची एकूण संपत्ती ७८० मिलियन डॉलर होती. यावर्षी तिच्या संपत्तीत वाढ होऊन ती १०० कोटींपर्यंत पोहोचली आहे. 

मॅगजीननुसार, किमने आपले दोन बिजनेस, रियल एस्टेट आणि विभ‍िन्न एंडोर्समेंट डील्समुळे इतकी संपत्ती मिळवली. किमने २०१७ मध्ये आपला कॉस्मेट‍िक बिजनेस लॉन्च केला होता. तिच्या पहिल्या लॉन्चमध्ये दोन तासांच्या आत तीन लाख कंटोर किट्स (Contour Kits) विक्री झाले होते. २०१८ पर्यंत किमने आपल्या कॉस्मेट‍िक प्रोडक्टमध्ये आयशॅडो, कन्सीलर, लिपस्ट‍िक आणि परफ्यूम्सचा समावेश केला. तिच्या या प्रॉडक्टने तिला १०० मिलियन डॉलरचा नफा मिळवून दिला. 

फोर्ब्सच्या माहितीनुसार, तिचा दुसरा बिझनेसचे शेअर २२५ मिलियन डॉलरपर्यंत पोहोचले. त्यामुळे तिला बिलिनियर होण्यात हे मदतशीर ठरलं.  

क‍िमच्या जवळ कमाईची अन्य माध्यमे 

या दोन बिजनेसेजशिवाय किम कर्दाश‍ियांच्या कमाईमध्ये रियल एस्टेट, कीपिंग अप विथ कर्दाश‍ियंस, एंडोर्समेंट डील्स, मोबाईल गेम, कीमोजी ॲपचे देखील योगदान आहे. किमच्या जवळ Calabasas मध्ये, नॉर्थ-वेस्ट लॉस एंजेल‍िसमध्ये तीन प्रॉपर्टीज आहेत.