Thu, Jan 28, 2021 05:02नोरो फतेहीने डान्ससोबत गायले ‘दिलबर’ गाण्याचे अरेबिक व्हर्जन

Last Updated: Nov 25 2020 8:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनय आणि नृत्याच्या अदाकारीने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचा नवा जलवा सर्वांसमोर आला आहे. यावेळी नोराने आपल्या डान्सने नव्हे तर स्वत: गायलेल्या अरेबिक गाण्याने चाहत्यांचे हृदय जिंकले आहे. तीने स्टेजवर ‘दिलबर’ या गाण्याचे अरेबिक व्हर्जन गाऊन सर्वांना आपल्याकडे गाणे गाण्याचेही कौशल्य असल्याचे दाखवून दिले. सध्या तीने गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

एका डान्स कार्यक्रमामध्ये अभिनेत्री नोरा फतेही ‘दिलबर’ या आपल्या गाण्याच्या अरेबिक व्हर्जनवर गाताना दिसली. ती आपल्या सहकार्यासोबत हे गाणे गात सोबत डान्स ही करत होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती आपल्या सहकाऱ्यांसोबत अरेबिकमध्ये ‘दिलबर’ हे गाणे गाताना व्हिडिओत दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

नेहमीच आपल्या अभिनय आणि डान्सने चाहत्यांवर प्रभाव टाकणाऱ्या नोरो फतेहीचा नवा अंदाज यानिमित्ताने समोर आला. ती डान्स सोबत उत्तम गाणे गात असल्याने तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओला खूप लाईक केले आहे. तसेच अनेकांनी चांगल्या कमेंट दिल्या आहेत.