Thu, Oct 29, 2020 07:50होमपेज › Solapur › विठ्ठल मंदिरात तुळस पानांची आरास

विठ्ठल मंदिरात तुळस पानांची आरास

Last Updated: Oct 17 2020 10:43PM
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी नित्योपचार सुरू आहेत. शनिवारी शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ  झाला आहे. यानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने रुक्मिणीमातेच्या गाभार्‍यात व मंदिरात कारनेशन, गुलाब, जरबेरा, मोगारा, झेंडू व तुळशीच्या पानांची आरास करण्यात आली आहे. वैकुंठ वाशिणी, कान्हाई, कृष्णाई, विठाई, जगनमाता  अशी विविधरंगी फुलांनी नावे कोरण्यात आली आहेत. ही फुलांची आरास पुणे येथील राम जांभूळकर यांनी श्री चरणी अर्पण केली आहे. फुलांची आरास करण्यासाठी मंदिर समितीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेे. भाविकांना मंदिर समितीच्या वेबसाईटवर तसेच व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक पेजद्वारे करण्यात आलेल्या सजावटीचे दर्शन घेता येत आहे.

 "