Tue, Aug 04, 2020 10:19होमपेज › Solapur › ग्रामीणमध्ये आणखी दोघांचा कोरोनाने मृत्यू

ग्रामीणमध्ये आणखी दोघांचा कोरोनाने मृत्यू

Last Updated: Jul 12 2020 1:32AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

सोलापूर  जिल्ह्यातील  ग्रामीण भागात  शुक्रवारी 37 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तिर्‍हे येथील 73 वर्षीय पुरुष, तर अक्कलकोटमधील बुधवार पेठेतील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णांची संख्या आता 710 वर पोहोचली असून मृतांची संख्या 32 झाली आहे. 

शुक्रवारी उत्तर सोलापुरातील नान्नज येथे 1 पुरुष, 1 महिला, मार्डीत 5 पुरुष, 1 महिला, तिर्‍ह्यात 1 पुरुष, 1 महिला, माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडीत 1 पुरुष, मोहोळमधील साठेनगरात 1 पुरुष, कोरवलीमधील 1 महिला, तर  देवडीत 1 पुरुष कोरेानाबाधित सापडला आहे.

बार्शीतील भवानी पेठ 1 पुरुष, सुभाषनगर 1 पुरुष, सासुरे 1 पुरुष,  वैरागमध्ये 1 पुरुष कोरोनाबाधित सापडला आहे. मंगळवेढ्यातील गुंगे गल्लीत 1 पुरुष, पंढरपुरातील जुनी पेठेत 1 पुरुष, बसवेश्वरनगर (इसबावी) 2 पुरुष, संत पेठेत 1 पुरुष, जिजाऊनगर 1 महिला, यमाई-तुकाई मंदिराजवळ 1 पुरुष आणि अक्कलकोटमधील स्वामी विवेकानंद पार्क येथे 1 महिला, बुधवार पेठेत 1 पुरुष, भारत गल्लीत 3 पुरुष, 1 महिला, मैंदर्गी रोडवर 1 पुरुष, करजगीत 2 पुरुष, तर भोसगा येथे 1 पुरुष, 2 महिला  रुग्णांची भर पडली आहे.     

जिल्ह्यातील 382 व्यक्तींचे शुक्रवारी अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 245 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अद्याप 68 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. आता अक्कलकोट तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या 135, बार्शी 121, करमाळा 6, माढा 18, माळशिरस 7, मंगळवेढा 3, मोहोळ 37, उत्तर सोलापूर 86, पंढरपूर 40, सांगोला 5 आणि दक्षिण सोलापुरात 252 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह  आढळले. आतापर्यंत 329 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 349 रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.