Mon, Sep 28, 2020 09:07होमपेज › Solapur › माढ्यात विवाहितेचा गळा दाबून खून

माढ्यात विवाहितेचा गळा दाबून खून

Last Updated: Aug 08 2020 9:17AM

संग्रहीत छायाचित्रमाढा : पुढारी वृत्तसेवा 

प्लॉट नावावर करुन देण्याच्या मागणीसह चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी माढा पोलिसात नवरा, सासू आणि सासरा अशा तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माढ्यातील शुक्रवार पेठेत शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. सना इरफान मोमीन (वय २७) असे मयताचे नाव असून इरफान रजाक मोमीन, रजाक मकबूल मोमीन, आसिया रजाक मोमीन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

त्या वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी आठ अधिकार्‍यांवर कारवाईचा प्रस्ताव

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, मयत सना (व २७ रा. मोमिन गल्ली, शुक्रवार पेठ. माढा) हिचे लग्न इरफान रजाक मोमीन याच्या बरोबर झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यापासून तिला सासरी नवरा इरफान रजाक मोमीन, सासरा रजाक मकबूल मोमिन, सासू आशिया रजाक मोमीन यांनी दोन महिने व्यवस्थित नांदून घेतले. त्यानंतर, तुझ्या आई-वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला काहीही दिले नाही. मानपान केला नाही म्हणत तिचा छळ सुरू केला. तर उस्मानाबाद येथील प्लॉट आमच्या नावावर कर असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण केली. त्यानंतर सतत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तिचा नवरा इरफान रजाक मोमिन याने सनाचा गळा दाबून जीवे मारले. अशी फिर्याद मयताचे वडील महंमदमुसा गुलामदस्तगीर अन्सारी (व ५२. रा. शालिमार कॉलनी एम.आय. डि. सी. उस्मानाबाद) यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करत आहेत.

 "