Wed, May 19, 2021 05:43
सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी ४७ बळी

Last Updated: May 06 2021 2:30AM

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. यामध्ये वाढत्या रुग्णाबरोबर मृत्यूची संख्या ही वाढत चालली आहे. मंगळवारी जिल्ह्यात दोन्ही कोरोना लाटेतील उच्चांकी 47 जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. यामध्ये  शहरातील 18 तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 29 जणांचा समोवश आहे. आज नव्याने 2 हजार 9 रुग्णांची भर पडली आहे. शहर व ग्रामीण असे 288 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. दोन्ही लाटेतील बरे होण्याचे एका दिवसातील प्रमाणही सर्वाधिक 1 हजार 674 इतके आहे.

मंगळवारी ग्रामीण भागातील 9 हजार 194 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 हजार 353 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 1 हजार 841 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, 1 हजार 263 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोलापूर शहरातील 2 हजार 686 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 518 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 168  जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत आणि कोरोनामुक्त होऊन 401 जण घरी गेले.  

आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 82 हजार 293  जण तर शहरातील 25  हजार 982 जण असे एकूण 1 लाख 8 हजार 275 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील 1 हजार 746 तर शहरातील 1 हजार 178 असे 2 हजार 924 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच  ग्रामीण भागातील 15 हजार 860 तर शहरातील 2 हजार 937 असे एकूण 18 हजार 797 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 64 हजार 687 जण आणि शहरातील 22 हजार 667 असे 87 हजार 354 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.