Sat, Aug 08, 2020 12:26होमपेज › Solapur › मोहोळ न्यायालयात कोरोनाचा शिरकाव 

मोहोळ न्यायालयात कोरोनाचा शिरकाव 

Last Updated: Jul 04 2020 1:14AM
मोहोळ (सोलापूर) : तालुका प्रतिनिधी 

मोहोळ शहर व तालुक्यात कोराना रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी (दि.३) मोहोळच्या न्यायालयात झाल्याचे समोर आले. मोहोळ न्यायालयात कार्यरत असणाऱ्या व सोलापुरात वास्तव्यास असणाऱ्या एका लिपिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने न्यायालयातील पाच जणांना क्वॉरंटाईन केले आहे.

अधिक वाचा : सोलापूर : पोटगीचा दावा मागे घेण्यासाठी घरात घुसून मारहाण

दरम्यान सोलापूर शहरात वास्तव्यास असणाऱ्या व  मोहोळ न्यायालयात कार्यरत असणाऱ्या एका लिपिकाला कोरोना झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्या लिपिकाने न्यायालयात रजा टाकली होती. 

अधिक वाचा : सोलापूर : दरोडेखोरांना पकडण्यात नातेपुते पोलिसांना यश

त्यापूर्वी तो न्यायाधीश आणि आपल्या अन्य सहकारी लिपिकांच्या व पक्षकारांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने न्यायालयातील पाच जणांना क्वॉरंटाईन केले आहे. तर न्यायालय परिसर सील करण्यात आला आहे. नगरपरिषद प्रशासनाने सदर परिसर सॅनिटायझरने फवारणी केली आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर मोहोळ शहर व तालुक्यात सर्वच शासकीय कार्यालयात गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. परिणामी तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मोहोळ शहर व तालुक्यात धोका कमी होण्याऐवजी आणखी वाढतच चालला आहे. सोलापूर शहरात सध्या हजाराच्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत. सोलापूर शहरातील अनेक परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केलेले आहेत. 

अधिक वाचा : आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने सोलापुरातून नोकरीच्या ठिकाणी ये-जा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी राहणे पसंत नसल्याचे समोर आले आहे. सोलापूर शहरातून अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी मोहोळ शहर व तालुक्यात नोकरीला आहेत. हे कर्मचारी दररोज सोलापूर शहर ते मोहोळ तालुका असा प्रवास करतात.