Tue, Sep 29, 2020 19:32होमपेज › Satara › परप्रांतीयाकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

परप्रांतीयाकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:07PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरालगत कोडोली परिसरात अवघ्या तिसरीमध्ये शिकत असणार्‍या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे संशयित परप्रांतीय असून शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर पोक्सोप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  नागरिकांनी संशयिताला पकडून पोलिसांकडे दिले.

राजेश नायक (सध्या रा. कोडोली मूळ रा. बिहार) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार पालक हे एमआयडीसी येथे कामाला असून मूळचे वाई तालुक्यातील आहेत. कामानिमित्त सध्या ते कोडोली येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्य करत आहेत. बुधवारी दि. 27 रोजी तक्रारदार हे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खुर्चीवर बसले होते. यावेळी तक्रारदार यांची 8 वर्षांची मुलगी बिल्डिंगच्या गाळ्यामध्ये अभ्यास करत बसली होती.

यावेळी संशयित राजेश नायक हा मुलगी अभ्यास करत असलेल्या ठिकाणी गेला. काही कालावधी गेल्यानंतरही संशयित बराचवेळ त्याठिकाणी असल्याने तक्रारदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता संशयित मुलीशी गैरवर्तन करत होता. ती घटना पाहिल्यानंतर संशयित राजेश नायक याने घाबरून तक्रारदार यांना हिसका मारून तेथून पळ काढला. या प्रकाराने पीडित मुलगी कमालीची घाबरली होती.

त्या मुलीला घरी नेल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या एका मित्राला फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही संशयिताच्या खोलीमध्ये जावून मुलीबरोबर गैरकृत्य केल्याप्रकरणीचा जाब विचारल्यानंतर तो पळून जावू लागला. अखेर परिसरातील नागरिकांनी संशयिताला पकडले व शहर पोलिस ठाण्यात घेवून गेले. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर राजेश नायक याच्याविरुध्द पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.