Wed, Aug 05, 2020 19:41होमपेज › Satara › 'नवी मुंबईतील पुनर्वसन भूखंड घोटाळ्याची चौकशी करणार'

'नवी मुंबईतील पुनर्वसन भूखंड घोटाळ्याची चौकशी करणार'

Last Updated: Jul 03 2020 9:15PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबईत कोयना प्रकल्पग्रस्तांना जमिनी देण्यात आल्या होत्या. त्या कवडीमोलाने खरेदी करण्यात आल्या. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. संबंधित जमीन पुन्हा शासनजमा करण्याच्या विचारात असून कोर्टाच्या निर्देशाकडेही लक्ष आहे. याचबरोबर ही जमीन महागडी असल्याने आम्ही यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्ससन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

अधिक वाचा :चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' घोषणेवर पंकजा मुंडे म्हणाल्या..

दरम्यान यात कोणताही गैरप्रकार झाला असेल तर ती जमीन शासन जमा झाली पाहिजे. तसेच प्रकल्पग्रस्ताला जमीन दिल्यावर त्यांना मालकी हक्क मिळतो. अशा जमिनींची खरेदी-विक्री करणारे रॅकेट थांबवण्यासाठी किमान दोन वर्षे प्रकल्पग्रस्ताला जमीन विकता येणार नाही असा निर्णय घेण्याचा विचार शासन करत आहे. तशी दुरुस्ती करावी लागेल, असेही वडेट्टीवार यांनी सांगीतले.