Tue, Aug 04, 2020 10:48होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात आणखी चौघांचा बळी

सातारा जिल्ह्यात आणखी चौघांचा बळी

Last Updated: Jul 10 2020 11:26PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांसह मृत्यूचे थैमान सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात 4 जणांचा बळी गेला असून, त्यात सातारा शहरातील एकाचा समावेश आहे. रात्री उशिरा 58 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा 1 हजार 601 झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी नव्याने 561 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यांच्या रिपोर्टची धास्ती लागून राहिली तर 16 जणांनी कोरोनावर यशस्वी मातही केली. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जिल्ह्याने दीड हजारांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी रात्री आणखी 58 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी आणि गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या बाधितांमध्ये सातारा तालुक्यात अक्षरश: कहर झाला. या 2 दिवसांत तालुक्यातील तब्बल 41 जण पॉझिटिव्ह आले असून सातारा शहरातही बाधित झपाट्याने वाढल्याचे भीषण वास्तव पुन्हा समोर आले. 

सातार्‍यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या जिल्हा प्रशासनासाठीही डोकेदुखी ठरू लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात शाहूनगर येथील 65 वर्षीय कोरोना बाधित (सारी) असलेल्या 65 वर्षीय वृद्ध, कृष्णा हॉस्पिटल कराड येथे पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, लटकेवाडी (सावडे) येथील 52 वर्षीय पुरुष अशा तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील 62 वर्षीय वृद्धाचा मृत्यू उपचारादरम्यान घेतलेला मात्र, वृद्ध मृत्यू झाल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

शुक्रवारी रात्री वाई तालुक्यातील परखंदी 1, ब्राह्मणशाही 2, ओंकार गार्डन जेजुरीकर कॉलनी 1, पसरणी 1 असे पाच बाधित आढळले आहेत. फलटण तालुक्यातील सरडे येथील दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. पाटण तालुक्यातील गोकुळनगर 1, मिरगाव 1, बांबोडे 1 व कोयनानगर 2 असे पाच जण बाधित आले आहेत. 

या शिवाय गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये खंडाळा तालुक्यातील 3, खटाव तालुक्यातील विसापूर 1, निमसोड 2, वरुड 1, वडूज 1 असे 5 पॉझिटिव्ह आढळले. वाई तालुक्यातील पसरणी 3, बोपेगावात 1 असे 4 बाधित आढळले. कराड तालुक्यातील मलकापूर 1, उब्रंज 1, तळबीड 1 असे तीन बाधित आढळले. पाटण तालुक्यातील महिंद 1, माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक 4, मार्डी 1 असे 5 जणांना लागण झाली. जावली तालुक्यातील पुनवडी 8, कास 7, कुसुंबी मुर्‍हा 1 असे 16 बाधित आढळले. सातारा तालुक्यातील रविवार पेठ 1, जिहे 7, कण्हेर येथील 2 असे 10 पॉझिटिव्ह आढळले. फलटण तालुक्यातील गुणवरे 1, सरडे 1, मलटण 1 असे 3 अशा 51 जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

शुक्रवारी 16 जणांना डिस्चार्ज दिला आहे. जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 1 हजार 601 झाला असून आतापर्यंत 950 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 65 जणांचा मृत्यू झाला असून 586 बाधितांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.