Fri, Sep 25, 2020 18:28होमपेज › Satara › पोलिसांनी स्वत: भरले रस्त्यातील खड्डे (video)

पोलिसांनी स्वत: भरले रस्त्यातील खड्डे (video)

Last Updated: Aug 14 2020 1:59PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

शेंद्रे (ता. सातारा) येथील पुणे - बंगळूर महामार्गावर आज एक अनोखे चित्र पाहावयास मिळाले. एरवी शिस्तीसाठी कायम दंडुका दाखवणारे पोलिस स्वत: हातात पाटी - खोरे घेऊन खड्डे भरताना पाहायला मिळाले. वर्षांनुवर्षे महामार्गाचे वाजलेले तीन तेरा आणि खड्ड्याला सामान्य जनतेप्रमाणे पोलिसही वैतागले आहेत. या वैतागातूनच पुढे अपघात व इतर अनुचित प्रकार घडण्याआधीच हे खड्डे बुजविण्यासाठी पोलिसच सरसावले आहेत. त्यांच्या या भूमिकेला पाहून सर्वसामान्य सातारकरांनी अशा जबाबदार, संवेदनशील पोलिसांना सॅल्यूट ठोकला.

उरमोडी धरणाचे दरवाजे उघडले

शुक्रवारी (दि. १४) सकाळी शेंद्रे येथे महामार्गावर पोलिस गाडी उभी होती. पोलिस कर्मचारी मनोज जाधव, किरण चिकने यांनी पाटी व खोरे हाती घेतले आणि हायवेवर जिथे खड्डे आहेत ते भरण्याचे काम सुरू केले. सर्वसामान्य नागरिकांनी ही बाब हेरली व येता जाता पाहणारे नागरिक हे दृश्य शूटिंग करु लागले. तेव्हा या मार्गावरुन प्रवास करणारे साताऱ्याचे उद्योजक सागर भोसले यांनी या पोलिसांचे आपल्या मोबाईलवर शुटींग केले व हा व्हिडिओ दै. पुढारी करिता पाठविला. 

सातारा : कोयनेचे दरवाजे ९ इंचाने उचलणार

वास्तविक हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे आहे. मात्र त्यांचा व या महामार्गाचा ठेका घेतलेल्या रिलायन्स इन्फ्राचा कामाच्या नावाने कायम शिमगा आहे. खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याची खबरदारी घेत सातारा पोलिसांनी डागडुजी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सातारा जिल्ह्यात धुवाँधार पाऊस

 "