Tue, Sep 29, 2020 09:22होमपेज › Satara › कोयनेचे सहा वक्री दरवाजे १.९ फुटाने वर उचलले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

कोयनेचे सहा वक्री दरवाजे १.९ फुटाने वर उचलले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Last Updated: Aug 15 2020 12:46PM
पाटण : प्रतिनिधी

कोयना  धरणांतर्गत  विभागात  पावसाचा जोर वाढला असून धरणातील एकूण पाणीसाठा 86 टीएमसी झाला आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी 41389 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने शनिवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे 1.9 फुटाने वर उचलले. त्यातून 9310 व धरण पायथा वीजगृहातील एक जनित्र सुरू करून त्यातून 1050 असे एकूण 10410 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

पूर्वेकडील विभागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कोयना नदीतील मुळचे पाणी व धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे. 

पावसाचा जोर व धरणातंर्गत विभागातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्यास रविवारी धरण दरवाजे याहीपेक्षा अधिक उचलण्यात येतील. तथापी पूर्वेकडे नदीपात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता व पूर, महापूराचा संभाव्य धोका लक्षात घेऊनच आगामी काळातपाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली. कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 1.9 फुटाने वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

 "