Wed, Jun 23, 2021 01:00
उदयनराजे म्हणाले, ‘संभाजीराजे माझे बंधू कधीही भेटू शकतात’

Last Updated: Jun 11 2021 3:38PM

सातारा: पुढारी ऑनलाईन 

संभाजीराजे माझे बंधू आहेत, ते कधीही भेटू शकतात. येत्या काही दिवसांत माझी आणि त्यांची भेट होईल, त्यातून चांगले काही निघेल, असा विश्वास खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला. संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट होणार होती परंतु ती आज झाली नाही. या पाश्वभूमीवर ते बोलत होते. 

वाचा : काकांचा मुडदा पाडा आणि पुतण्याला घेऊन जा, पण पोलिस येताच मुलाला मारुन टाकले!

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे आक्रमक झाले असून आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ते खासदार उदयनराजे यांची भेट घेणार आहेत. मात्र, उदयनराजे बिझी असल्याने ही भेट होऊ शकली नाही. याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, ‘संभाजीराजे माझे बंधू आहेत, ते कधीही भेटू शकतात. त्यांचे घर आहे. ते कधीही येऊ शकतात. आम्ही लवकरच भेटू. या भेटीतून चांगले काही निघेल.’

मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान संभाजीराजे उदयनराजेंची भेट घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. त्यामुळे ही भेट नेमकी कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं असतानाच स्वत: उदयनराजे यांनी खुलासा केला आहे. 

वाचा : महाराष्ट्रात ३० वर्ष सेवा देताय आणि तेथील पोलिसांवर विश्वास नाही? परमबीर सिंगांना तगडा झटका!

संभाजीराजे यांनी कोल्हापुरात १६ जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आज पुणे किंवा साताऱ्यात संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यात भेट होईल, असे बोलले जात होते. मात्र आज ही भेट झाली नाही. उदयनराजे यांची पूर्वनियोजित बैठक असल्याने ते भेटू शकले नाहीत. ते म्हणाले, ‘ माझ्या अगोरदच काही भेटीगाठी काही ठरल्या होत्या. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ अधिकाऱ्यांसोबत रस्त्याबाबतच्या दुरुस्तीसाठी आज महत्त्वाची बैठक आहे. माझ्या पूर्वनियोजित भेटी असल्याने आज आमची भेट होऊ शकणार नाही, ते  माझे बंधू आहेत. तुमचं घर आहे तुम्हीही कधीही येऊ शकता असं मी त्यांना सांगितलं आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात मी त्यांच्यासमवेत आहे. आम्ही भेटणार आहे. फक्त दोन तीन दिवसांतील पूर्वनियोजित भेटीगाठी संपल्या की आम्ही भेटू.’

ही तर वादळापूर्वीची शांतता...

दरम्यान संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करून  ‘ही वादळापूर्वीची शांतता आहे. कुणीही समाजाला गृहीत धरू नये. आम्ही जिल्ह्याजिल्ह्यात केवळ बैठका, चर्चाच करतोय असे नाही. त्याच दिवशी पुढील पुणे ते मुंबई या ‘लाँग मार्च’ची तयारी करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात तयारीच्या बैठका घेणार आहोत. लाँग मार्च हा सरकारला परवडणारा नसेल,’ असा इशारा दिला.

वाचा : शरद पवारांनी शिवसेनेचे कौतुक का केले?