Fri, Sep 25, 2020 19:00होमपेज › Satara › उरमोडी धरणाचे दरवाजे उघडले (video)

उरमोडी धरणाचे दरवाजे उघडले (video)

Last Updated: Aug 14 2020 1:18PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा 

उरमोडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून भागात ओढे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पाण्याची आवक वाढल्याने उरमोडीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. उरमोडी पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गाने असून १३ तारखेला सकाळी आठ वाजता उरमोडी वीज गृहातून ४०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे.

 अधिक वाचा :सातारा जिल्ह्यात धुवाँधार पाऊस

तर १४ ऑगस्ट शुक्रवारी साडेअकराच्या दरम्यान जलाशयाच्या वक्र दरवाजामधून २६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी कॅनॉलद्वारे मान खटावला सोडण्यात येणार आहे. या परिसरातील लघुपाट बंधाऱ्यांचे तलावही भरून वाहू लागले आहेत.

अधिक वाचा :कोयना धरणातून आजपासून विसर्ग

 "