Fri, Sep 25, 2020 19:27होमपेज › Satara › सातारा : कोयनेचे दरवाजे ९ इंचाने उचलणार

सातारा : कोयनेचे दरवाजे ९ इंचाने उचलणार

Last Updated: Aug 14 2020 1:00PM

संग्रहीत छायाचित्रपाटण : पुढारी वृत्तसेवा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ४१ हजार ३८९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात आता एकूण पाणीसाठा ८२.७५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणाची एकूण पाणी साठवण व सध्या पाणी सामावून घेण्याची क्षमता विचारात घेऊन धरण परिचालन सुचीप्रमाणे आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून प्रतिसेकंद २ हजार १०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे ९ इंचांनी वर उचलून त्यातून प्रतिसेकंद विनावापर ३ हजार ७०० क्युसेक असे एकूण ५ हजार ६०० क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. 

अधिक वाचा :सातारा जिल्ह्यात धुवाँधार पाऊस

या सोडलेल्या पाण्यासह पूर्वेकडे सुरू असलेल्या पावसामुळे कोयना आणि कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पूर्वेकडे मोठा पाऊस नसल्याने नदीपात्रात ज्यादा पाणी सामावून घेण्याची क्षमता असल्याने पुराचा धोका निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

अधिक वाचा : कोयना धरणातून आजपासून विसर्ग

 "