होमपेज › Satara › सातारा : एसटी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन (video)

सातारा : एसटी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन (video)

Published On: Sep 16 2019 12:09PM | Last Updated: Sep 16 2019 2:04PM

सातारा :एसटीची अडवणूक करताना कुशी नागेवाडी आणि लिंब परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी.  लिंब : वार्ताहर

नागेवाडी (ता. सातारा) येथे एसटी बसेस थांबत नसल्याने अखेर कुशी नागेवाडी आणि लिंब परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी महामार्गावरील सर्व्हिस रोडवर एसटी रोखून धरत परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नवीन एसटी सुरू करण्याची मागणी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून लिंबफाटा व नागेवाडी परिसरात सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांसाठी साताराला जाण्यासाठी एसटीथांबत नाहीत. यामुळे अखेर सोमवारी (दि.१६ रोजी) सकाळी सुमारे शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांनी नागेवाडी येथे सातारकडे जाणाऱ्या आठ एसटी रोखून धरल्याने नागेवाडी येथे महामार्गावर एक मोठे आंदोलन उभे राहिले. यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यात याची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. 

यादरम्यान या आंदोलनाची माहिती सातारा आगारास मिळताच वाहतूक नियंत्रक डी. डी. शिंदे यांनी नागेवाडी येथे येऊन विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना उद्यापासून नवीन एसटी सुरू करण्याचे आश्वासन दिले.