Tue, Sep 29, 2020 08:53होमपेज › Satara › अखेर सिव्हिल सर्जनची बदली, साताऱ्याच्या दौऱ्यात आरोग्य मंत्री 'नायक'! (video)

अखेर सिव्हिल सर्जनची बदली, साताऱ्याच्या दौऱ्यात आरोग्य मंत्री 'नायक'! (video)

Last Updated: Aug 09 2020 12:20PM
सातारा : हरीष पाटणे 

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दहा दिवसांपूर्वी स्त्री जातीचे अर्भक टॉयलेटमध्ये संशयास्पदरीत्या मृत अवस्थेत आढळल्यानंतर या घटनेने संताप निर्माण झाला होता. सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या भानगडी  दै. पुढारीने समोर आणल्या. त्याबातम्यांचा दणका आज सिव्हिल सर्जन डॉ. आमोद गडीकर यांना बसला असून आज त्यांची राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तडकाफडकी बदली केली. ही माहिती टोपे यांनी शरद पवार यांच्या सोबत सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असता स्वतःच पुढारीला दिली. त्यामुळे पुढारीच्या खमक्या पत्रकारितेचे जिल्ह्यात कौतुक होत असून आरोग्य मंत्र्यांच्या निर्णयाचे जोरदार  स्वागत होत आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या चार महिन्यापासून कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे. याचा मुकाबला करण्यासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय तथा सिव्हिल पूर्णतः अपयशी ठरले आहे. कोरोना सोबतच सिव्हिलच्या अनेक भानगडी समोर आले असून दै. पुढारीने त्याबाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे. नुकतेच सिव्हिलमध्ये स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली. तर त्याबाबत संतापाची लाट निर्माण झाली. पुढारीने या विषयावरून रान उठवले. आज कराडमध्ये राज्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित असल्याने ते सिव्हिल सर्जन डॉक्टर आमोद गडीकर यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दैनिक पुढारीने रविवारच्या अंकात सातारा जिल्हा वाचवा हो! अशी हाक दिली. तसेच सिव्हिलच्या आतापर्यंत च्या भानगडीचा पंचनामा सविस्तर मांडला. कराड येथे सातारा जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधींनी शरद पवार व आरोग्यमंत्री यांना पुढारी वाचायला दिले. हे सगळे भयानक आहे असे उदगार शरद पवार यांनी काढले आणि आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे पाहिले. त्यावर टोपे यांनी आपण आजच्या आज निर्णय घेऊ असे संगितले.

दरम्यान दैनिक पुढारीचा रविवारचा अंक त्यांनी सोबत ठेवला. त्यानंतर बैठकीतुन बाहेर येऊन टोपे त्यांनी डॉक्टर अमोल गडीकर यांची सातारा जिल्ह्यातून आजच बदली करत असल्याचे सांगितले. दै. पुढारीने टोपे यांना नायक चित्रपटातील अनिल कपूर व्हा असे म्हटले होते, टोपे यांनी ही पुढारीची भूमिका ही सातारा जिल्ह्यातील जनतेची मागणी असल्याने तातडीने निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे सातारा जिल्ह्यातील जनतेने स्वागत केले आहे.

 "