Wed, May 19, 2021 05:41
सातारच्या साखरगाठीला कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातून मोठी मागणी

Last Updated: Apr 12 2021 2:22AM

लिंब : पुढारी वृत्तसेवा 

सातारच्या साखरगाठीला कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातून मोठी मागणी आहे. मात्र कोरोनामुळे साखरगाठीची परदेशवारी रद्द झाली आहे.

अधिक वाचा : सातारा जिल्ह्यातील खाणींना नऊ महिने मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय 

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गुढी उभारली जाते. यासाठी साखरगाठीची मोठी आवश्यकता असते. या साखरगाठीसाठी सातारा प्रसिद्ध असून, सातारा शहरातील राऊत बंधूंच्या साखरगाठीला मोठी मागणी आहे. गुढीपाडव्याच्या आधी सुमारे महिनाभरापासून साखरगाठी बनविण्याचे काम सुरु असते. अगदी दहा रुपयांपासून ते तब्बल एक हजार रुपयांपर्यंत साखरगाठीची निर्मिती या ठिकाणी केली जात आहे. तर साखरगाठी एक किलोसाठी ऐंशी रुपयापासून एकशे पन्नास रुपयेपर्यंत भाव  आहे. 

अधिक वाचा : लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे साखरगाठीची परदेशातून होणारी मोठी मागणी कमी झाल्याने साखरगाठी बनविण्याचे प्रमाण काहीशे कमी झाले आहे. गुढीपाडव्याच्या सणासाठी दरवर्षीपेक्षा यंदा चाळीस ते साठ टक्केच निर्मिती झाली आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात साखरगाठीची निर्मिती केली जाते, अशी माहिती सातारामधील मिठाई व्यावसायिक आणि साखरगाठी उत्पादक मोहन राऊत यांनी दिली.