Wed, May 19, 2021 04:30होमपेज › Satara › कोजागिरीनिमित्त दुग्धपानासह समग्र आरती निरुपण पुस्तक प्रकाशन

कोजागिरीनिमित्त दुग्धपानासह समग्र आरती निरुपण पुस्तक प्रकाशन

Last Updated: Oct 14 2019 12:46PM

समग्र आरती निरुपण पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मान्यवरमसूर (सातारा) : पुढारी ऑनलाईन

सण उत्सवात आपण देवाच्या आरत्या अगदी भक्ती भावाने म्हणतो. मात्र या आरत्या म्हणताना त्यातील अनेक शब्द माहीत नसल्याने अनावधानाने चुकीचे म्हटले जातात. मात्र प्रत्येक आरतीमधील प्रत्येक शब्दाला तसेच आरतीच्या एकूणच रचनेला नेमका असा अर्थ असतो. त्याची उकल मात्र प्रत्येकाला झालेली असतेच असे नाही. भक्तीचा भाव मनात असला तरी आरती म्हणताना त्याचा अर्थ माहिती नसल्याने पूर्ण भाव भक्तीमध्ये उतरतोच असे नाही. त्यामुळे निरुपणाच्या माध्यमातून महत्वाच्या ११ आरत्यांचा भावार्थ समजून सांगण्याचे काम 'समग्र आरती निरुपण' या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हे पुस्तक वाचून आरती म्हणणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात नेमका भाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लेखक प्र. भा. रेळेकर यांनी सांगितले.

येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघामार्फत कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्र. भा. रेळेकर लिखित समग्र आरती निरुपण या पुस्ताकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. रेळेकर यांनी यापूर्वी ६० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विश्वास धायगुडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे उपस्थित होते. तसेच माजी सनदी अधिकारी रमेश जगदाळे आणि डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी यावेळी प्रमुख उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.

नंदकुमार तथा एन. के. पाटील हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. कोजागिरी पौर्णिमा असल्याने दरवर्षीप्रमाणे यावेळी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अल्पोपहार तसेच दुग्धपानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तसेच मसूर पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.