Thu, Oct 01, 2020 17:44होमपेज › Satara › सिव्हिलचा बेजबाबदारपणा; आंदोलनाचा इशारा (Video)

सिव्हिलचा बेजबाबदारपणा; आंदोलनाचा इशारा (Video)

Last Updated: Aug 08 2020 1:40PM

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाडसातारा : पुढारी वृत्तसेवा

सिव्हिलमधील स्वच्छता गृहाच्या ड्रेनेजमध्ये मृत मानवी अर्भक सापडले ही आरोग्य यंत्रणेला काळिमा फासणारी बाब आहे. आरोग्य विभागाचे प्रमुख असणारे सीएस डॉ. आमोद गडीकर हे आपली जबाबदारी झटकत आहेत. सरळसरळ खोटे बोलत असून त्यांना त्यांची जबाबदारी समजत नसले तर रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जबाबदारीची आठवण करून देईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने  दिला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलला भेट घेत सीएस डॉ. गडीकर यांना घेराव घातला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये हेही उपस्थित होते. 

अशोक गायकवाड म्हणाले, सिव्हिलमधील स्वच्छता गृहाच्या ड्रेनेजमध्ये मृत मानवी अर्भक सापडले. हे अर्भक ज्या सफाई कर्मचाऱ्याने बाहेर काढले त्यालाच कामावरून काढण्यात आले. त्या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत सिव्हिल सर्जन हे आपली जबाबदारी झटकत आहेत. चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व कोरोना सेंटरमध्ये अस्वच्छता पसरली आहे. रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत. अशा या भोंगळ कारभाराबाबत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
 

 

 "