Tue, Sep 29, 2020 19:14होमपेज › Satara › कावीळ झालेल्यांना विकास कसा दिसणार 

कावीळ झालेल्यांना विकास कसा दिसणार 

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:01PM

बुकमार्क करा
वाई :  प्रतिनिधी

पिराचीवाडी येथील रस्ता गायब झाल्याचे निमित्त करून विराज शिंदे हे नाहक आ. मकरंद पाटील यांच्या कार्यपद्धतीवर चिखलफेक करीत आहेत. पिराचीवाडी परिसराचा विकास राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आ.पाटील यांनी केला असून हा विकास काविळीने डोळे पिवळे झालेल्यांना कसा दिसणार? असा सवाल पिराचीवाडीच्या सरपंच उज्ज्वला मांढरे यांनी  केला. दरम्यान हा रस्ता पूर्ण झाल्याचे सांगत पं.स.सदस्या ऋतुजा शिंदे यांना पिराचीवाडी नक्की कोठे आहे हे माहीत आहे का? असा घणाघातही त्यांनी केला.पिराचीवाडी येथील पोळ वस्ती ते दत्त मंदिर अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण न करताच 1लाख 98 हजार रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या संदर्भात आपली बाजू पत्रकार परिषदेत मांडताना सौ.मांढरे बोलत होत्या. 

पिराचीवाडीत अनेक विकासकामे झाली आहेत. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत पोळ वस्ती ते कोचळे वस्ती हा रस्ता पूर्ण झाला आहे. पोळ वस्ती ते दत्त मंदिर हा रस्ता आ. पाटील यांच्या प्रयत्नातून व आ. नरेंद्र पाटील यांच्या निधीतून पूर्ण झाला आहे. या रस्त्याबाबत ग्रामस्थांची कसलीही तक्रार नाही. पण विराज शिंदे यांनी या रस्त्यासंदर्भातील वृत्तांमध्ये नाहक माझे नाव गोवले आहे, असे  उज्ज्वला मांढरे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस राजेंद्र पोळ, सोसायटीचे चेअरमन महादेव भांदिर्गे, उपसरपंच दशरथ धोंडे, सदस्य सचिन पेटकर,रुपाली पोळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.