Fri, Oct 02, 2020 00:49होमपेज › Satara › सातारमध्ये पोलिस ठाण्यातच राडा, धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला (video)

सातारमध्ये पोलिस ठाण्यातच राडा, धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला (video)

Last Updated: Jun 04 2020 1:01PM

संग्रहित छायाचित्रसातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा तालुका पोलिस ठाण्यात सकाळी ११ वाजता धारदार शस्त्राने एकमेकांवर हल्ला झाल्याने एकच थरकाप उडाला. या घटनेत दोघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. दोघांमध्ये वाद असल्याने ते पोलिस ठाण्यात आल्यानंतर हा राडा झाला.

कोयना धरण परिसरात दमदार पाऊस

याबाबत प्राथमिक माहिती अशी सैदापुरातील दोघांचा वाद झाला होता. त्यातून ते गुरुवारी सकाळी सातारा तालुका पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये खुन्नस झाली. त्यानंतर एकाने कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने दुसऱ्यावरपहिला वार केला. त्यांनतर त्याच धारदार हत्याराने दुसऱ्याने वार केला. दरम्यान थेट पोलिस ठाण्यात हल्ला झाल्याने पोलिसांची धावाधाव उडाली. दोघे गंभीर जखमी झाले असून सिव्हिलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 "