Fri, Oct 02, 2020 01:32होमपेज › Sangli › उर्मिला मातोंडकरने घेतली सांगली पूरग्रस्तांची भेट (Video)

उर्मिला मातोंडकरने घेतली सांगली पूरग्रस्तांची भेट (Video)

Published On: Aug 14 2019 6:23PM | Last Updated: Aug 14 2019 6:27PM

सरकारने पुनर्वसन करण्याची गरज : उर्मिला मातोंडकरसांगली : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. येथील पूरबाधित भागात जाऊन तिने पाहणी केली. उर्मिलाने पूरग्रस्त कुटुंबांना भेटून दिलासा दिला. उर्मिलाने मीडियाशी बोलताना सांगितले की, पुरामुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे कठिण होत आहे. पूरग्रस्तांचे खूप नुकसान झाले आहे. यावेळी सरकारने पुनर्वसन करण्याची गरज आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. मायबाप सरकारने याची दखल घ्यावी. 

उर्मिलाने गणपती पेठ येथे पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. 

पूरग्रस्तांना मदत पोहोचणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे. थोडी परतफेड करतेय. माणुसकीच्या नात्याने मी येथे आले. मी बॉलिवूड किंवा इतर कोणालाही मदतीसाठी आवाहन करणार नाही.