Sat, Aug 15, 2020 15:41होमपेज › Sangli › तासगाव शहरात आणखी दोघांना कोरोना

तासगाव शहरात आणखी दोघांना कोरोना

Last Updated: Aug 01 2020 6:28PM

संग्रहीत छायाचित्रतासगाव : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना चाचणी वाढवली आहे. आज आलेल्या अहवालात तासगाव शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

शनिवारी तासगाव शहरातील आणखी दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मुस्लिम मोहल्ला परिसरातील ६५ वर्षीय आणि नरगुंदे बोळ परिसरातील एका ३८ वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनिल माळी यांनी माहिती दिली आहे.

वाचा : समडोळीत कोरोनाची धास्ती कायम, नवे आठ रुग्ण पॉझिटिव्ह