Wed, Jun 23, 2021 01:53होमपेज › Sangli › सांगलीत छेडछाड काढणाऱ्या फरार सूत्रधारास अटक

सांगली : विद्यार्थिनीची छेडछाड; फरार राजेंद्र पवार अटकेत

Published On: Jun 18 2019 5:17PM | Last Updated: Jun 18 2019 5:47PM
इस्लामपूर : वार्ताहर 

राज्यभर गाजलेल्या मसुचीवाडी (ता.वाळवा) येथील विद्यार्थिनींच्या छेडछाड प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजेंद्र विठ्ठल पवार-तपकीरे (वय ३८, रा. बोरगाव) याला आज, मंगळवारी (दि.१८) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. राजेंद्र पवार-तपकीरे हा गेल्या तीन वर्षापासून फरार होता. आज त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना अखेर यश आले. त्याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मे २०१६ मध्ये पवार व त्याच्या साथीदारांच्या छेडछाडीला कंटाळून संबंधित विद्यार्थिनीने शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेने राज्यभर एकच खळबळ माजली होती. तर विधानपरिषदेतही हा प्रश्न गाजला होता. या प्रकरणी समाजातील सर्व स्तरातून मोठा संताप उसळल्यानंतर इस्लामपूर पोलिसांनी पवार याच्यासह चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पवार हा फरार होता.

आज, मंगळवारी पवार हा बोरगावात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिस उपनिरीक्षक खाडे, सहाय्यक पोलिस फौजदार राजू कदम, मच्छिंद्र बर्डे, सुनील चौधरी, जितेंद्र जाधव, सचिन कनप, दीपक ठोंबरे, राहुल जाधव, संदीप पाटील, अनिल कोळेकर, कुबेर खोत, आर्यन देशिंगकर, अतुल मोरे, सुप्रिया साळुंखे यांच्या पथकाने छापा टाकून त्याला अटक केली.