Wed, Aug 05, 2020 18:41होमपेज › Sangli › मिरज : 'त्या' बाधित डॉक्टरच्या संपर्कातील वृद्धाला कोरोना

मिरज : 'त्या' बाधित डॉक्टरच्या संपर्कातील वृद्धाला कोरोना

Last Updated: Jul 04 2020 8:51PM

संग्रहित छायाचित्रमिरज : पुढारी वृत्तसेवा 

मिरजेतील कोरोनाबाधित डॉक्टरकडे उपचार झालेल्या एका वृद्धाला आज कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या आठवड्यात मिरजेतील एका प्रसिद्ध डॉक्टरला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या डॉक्टरला उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले. त्या डॉक्टरचे हॉस्पिटल सील करून तेथे उपचार करणारे कर्मचारी व उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना क्वारांटाईन करण्यात आले.

वाचा :  सांगलीमध्ये चार ठिकाणी कंटेन्मेंट झोन

संबंधित डॉक्टरकडून उपचार घेऊन गेलेल्यांचा आरोग्य प्रशासनाने शोध घेतला होता. त्यापैकी ब्राह्मणपुरी दिंडीवेस परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाला त्रास होत होता. त्यामुळे त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्या वृद्धाचा अहवाल हा आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाने हा परिसर कंटोनमेंट झोन केला. कोरोना बाधिताच्या संपर्कात कोण कोण आले आहे. त्याचीही माहिती घेण्यात आली. दहा नातेवाईकांना संस्था क्वारांटाईन करण्यात आले आहे. अन्य दोघा नातेवाईकांना होम क्वारंटाइन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. 

वाचा :सांगलीत लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही : जिल्हाधिकारी