कासेगाव : पुढारी ऑनलाईन
राज्यभर सुरू असलेली भाजपची महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. 16) सांगली जिल्ह्यातील कासेगावमध्ये दाखल झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाजनादेश यात्रेचे कासेगावमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. देशमुख यांच्या भाजप प्रवेशामळे शिराळा मतदारसंघात ताकद वाढली आहे तसेच कमळ नक्की फुलणार असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कासेगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाकुर्डे बुद्रुकचे पाणी दिवाळीनंतर शिवारात पोहोचणार आहे. यासोबतच सत्यजित देशमुख यांच्या भाजव प्रवेशामुळे शिराळा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. तसेच कमळ नक्की फुलणार असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यासोबतच कोकरुडमध्ये स्व.शिवाजीराव देशभुख यांचे स्मारक बांधणार असल्याचे देखील त्यांच्याकडूक सांगण्यात आले.
या महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्हाभर रोड शो व पलूस, तासगावमध्ये सभा होणार आहेत. सांगलीतही रोड शोद्वारे कर्मवीर भाऊराव पाटील चौकात दुपारी 3 वाजता सभा होणार आहे. यावेळी फडणवीस यांची तोफ कडाडणार आहे. भाजपच्या जिल्ह्यातील प्रचाराचा प्रारंभच होणार आहे. यानिमित्ताने जिल्हा भाजपमय झाला आहे.