Wed, Jun 23, 2021 02:06होमपेज › Sangli › प्रकाश आंबेडकर यांनी राजा व्हावे : रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर यांनी राजा व्हावे : रामदास आठवले

Published On: Feb 24 2018 1:02PM | Last Updated: Feb 24 2018 1:14PMसांगली : प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा दंगलीनंतर केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चांगलीच जुंपली होती. याच वादाला फाटा देत ‘प्रकाश आंबेडकर यांनी तमाशातील राजा होऊन चालणार नाही, मात्र त्यांनी राजकारणातील राजा होणे गरजेचे आहे’ असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

देशभर चर्चा सुरू असणाऱ्या ‘पीएनबी’ मुद्यावरही ते बोलले. नीरव मोदी हा बँकांना फसवतो आणि पळून जातो;  मात्र गरजू गरीब लोकांना बँका कर्ज देताना टाळाटाळ करतात हे बरोबर नाही. अण्णाभाऊ साठे आणि महात्मा फुले महामंडळातील मंजूर कर्ज प्रकरणांची संख्या कमी आहे. ज्या बँका कर्ज देताना अडवणूक करतील त्या बँकांवर कारवाई करणार असेही ते म्हणाले.

‘राज्य सरकारमार्फत आंतजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50 हजार रुपये दिले जातात. कर्नाटकच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अधिक निधी देण्यासाठी तसेच मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थीनींना, वर्षातून दोन वेळा स्कॉलरशीप मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.