Wed, Jun 23, 2021 01:29होमपेज › Sangli › सांगली: काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का, आजी-माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

सांगली: काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का, आजी-माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Published On: Jun 05 2018 12:06PM | Last Updated: Jun 05 2018 12:17PMमुंबई/सांगली: पुढारी ऑनलाईन

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील 13 आजी-माजी नगरसेवकांनी आज (5 जून) भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थित हा प्रवेश करण्यात आला. 

भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी महापौर विवेक कांबळे,  सुरेश आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, महादेव कुरणे, आनंदा देवमाने, दिगंबर जाधव शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे, उद्योजक गणेश माळी, भिमराव बुधले, महेंद्र पाटील, अमोल सुर्यवंशी आदी समावेश आहे. 

या 13 आजी-माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. तर भाजपला मोठे बळ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले होते. तेव्हाच या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता. यासाठी हॉ़ल देखील बुक करण्यात आला होता. पण राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन झाल्यामुळे हा प्रवेश लांबणीवर पडला. त्यानंतर मुंबईत आज यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.