Sun, Aug 09, 2020 14:50होमपेज › Sangli › सांगली, मिरजेत ४४ पॉझिटिव्ह; निवारा केंद्रात आढळले ३७ रूग्‍ण  

सांगली, मिरजेत ४४ पॉझिटिव्ह; निवारा केंद्रात आढळले ३७ रूग्‍ण  

Last Updated: Jul 15 2020 5:13PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली आणि मिरज शहरात बुधवारी दुपारी 44 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सांगलीतील बेघर निवारा केंद्रातील 37, कुदळे प्लॉट सांगली 3, एका विद्यापीठातील विद्यार्थी 1, सांगलीवाडी 1, मंगळवार पेठ मिरज 1 आणि कमान वेस मिरज 1 अशा 44 जणांचा यामध्ये समावेश आहे.

सांगली शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आणखी 44 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बाधितांची संख्या 167 इतकी झाली आहे.

महापालिकेच्यावतीने शहरातील बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र चालविले जाते. या ठिकाणी शहरातील बेघरांना ठेवण्यात येते. दोन दिवसांपूर्वी या केंद्रातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे हे केंद्र सील करण्यात आले होते. या केंद्रातील 57 जणांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यामधील 37 जणांचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तर कुदळे प्लॉटमधील एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने धास्ती निर्माण झाली आहे.