Fri, Sep 25, 2020 17:48



होमपेज › Sangli › सदाभाऊ खोत यांनी दूध दरवाढीसाठी गोठ्यातून लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र 

सदाभाऊ खोत यांनी दूध दरवाढीसाठी गोठ्यातून लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र 

Last Updated: Aug 14 2020 1:17PM




इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

दूध दरवाढीच्या मागणीसाठी माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट गाईच्या गोठ्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. खोत यांनी वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर या त्यांच्या गावातून  मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले. अशी पाच लाख पत्रे राज्यातून मुख्यमंत्र्यांना दिली जाणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

अधिक वाचा :‘कृषी’च्या कारभाराची पथकातर्फे तपासणी

दूध दरवाढीच्या मागणीसाठी रायतक्रांती संघटनेच्या वतीने दूध आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू झाला. दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गाईच्या गोठ्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. १८ ऑगस्टपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून या दरम्यान ५ लाख पत्रे मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत.

अधिक वाचा :कडकनाथ घोटाळा : लेखापरीक्षण सुरू

या पत्रातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे किंवा राज्य सरकारने गायीचे दूध प्रतिलिटर ३० रुपये प्रमाणे खरेदी करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. जर सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार खोत यांनी दिला.

अधिक वाचा :सांगली जिल्ह्यात 313 कोरोना बाधित; 15 जणांचा मृत्यू





 







"