Thu, Jan 28, 2021 03:49सांगली : 'पक्षाच्या विचारांशी बांधील उमेदवारांना निवडून आणा'

Last Updated: Nov 26 2020 7:20PM
विटा : पुढारी वृत्तसेवा

विरोधक काय सांगतात ते महत्वाचं नसून पक्षाने जे उमेदवार आपल्याला दिलेत, त्यांना चांगल्या पद्धतीने काम करून चांगल्या मतांनी निवडून आणू या, असे आवाहन राष्ट्रवादीचे राज्य कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले. ते पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रमुख कार्यकर्ते आणि मतदारांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, युवा नेते वैभव पाटील, सुशांत देवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किसन जानकर, कुंडलचे श्रीकांत लाड, विक्रांत लाड, काँग्रेसचे रामरावदादा पाटील, संदीप मुळीक, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नितीन दिवटे आदी प्रमुख उपस्थित होते.

पाणी शुद्ध करणार्‍या बनावट यंत्राच्या कारखान्यावर छापा

यावेळी माजी आमदार पाटील म्हणाले, पक्षीय भेद विसरून पदवीधरचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करण्यासाठी आपल्याला मतभेद, राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून काम करायचे आहे. तसेच आपल्याला आवडो अगर न आवडो इथून पुढे पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम कराव लागणार आहे. कोण अधिक पळतंय कोण कमी पळतंय याचा विचार करू नका. मागच्या वेळेपेक्षा यावेळी वातावरण चांगले आहे. अरुणअण्णा हे निस्पृह, क्रांतीचा वारसा असलेले नेतृत्व आहे. विरोधी उमेदवाराच्या मनात सुद्धा ज्यांच्या विषयी आदर आहे. असा उमेदवार शरद पवार साहेबांनी दिला आहे. पक्षाच्या विचारांना बांधील असलेल्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करायचे आहे.

सांगली : खानापूर तालुक्यातील चोघेजण हद्दपार

तसेच ॲड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, गेल्या काही वर्षात भाजपने सत्तेत असताना इतर पक्षांना कशी वागणूक दिली. त्याची प्रतिक्रिया म्हणून महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विश्वजित कदम, जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत म्हणून प्रयत्नशील आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून एकदिलाने या निवडणुकीत उतरलो आहोत. संपूर्ण सांगली जिल्ह्यातच नव्हे तर कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा महाविकासआघाडी एक दिलाने काम करीत आहे. इथे सुद्धा येत्या दोन दिवसात मंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत आमदार बाबर गटाचा मेळावा आम्ही घेत आहोत. युवा नेते वैभव पाटील यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावा. दोन्ही उमेदवार आपल्या घरचे आहेत. जवळचे आहेत. प्रा. जयंत आसगावकर हे शिक्षक व संस्था चालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. मतदान नोंदणी करण्याची पहिली लढाई आपण यशस्वीरित्यापूर्ण केली आहे. आता मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. आतापर्यंत आपण अशा प्रकारच्या निवडणुकीत बाजूला राहून काम करत होतो. परंतु आता प्रत्यक्ष सक्रिय राहून पक्षाने जे उमेदवार दिले त्यांचेच काम करायचे आहे, असे वैभव पाटील यांनी सांगितले.

खानापूर तालुक्यातील चौघे संशयित हद्दपार

दरम्यान, श्रीकांत लाड यांनी जातीय वादी, वर्ण वर्चस्ववादी व्यवस्था येऊ नये म्हणून पुरोगामी विचारांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा असे मत व्यक्त केले. यावेळी किरण तारळेकर, विकास जाधव, दहावीर शितोळे, गजानन निकम, खानापूर तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, विशाल पाटील, प्रशांत पवार, महिला आघाडी च्या सुवर्णा पाटील यांच्यासह पदवीधर, शिक्षक मतदार आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.