Mon, Nov 30, 2020 14:04होमपेज › Sangli › ताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू

ताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 06 2018 1:04AMदेवराष्ट्रे : वार्ताहर

देवराष्ट्रे येथील मुक्‍ताबाई बापू भोंगाळे (वय 70) यांचा शनिवारी दुपारी ताकारी योजनेच्या कालव्यात  पडून मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद मनोहर यशवंत भोंगाळे यांनी दिली आहे. चिंचणी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मुक्‍ताबाई या  धुणे धुण्यासाठी गावालगत असलेल्या ताकारी योजनेच्या मुख्य कालव्यावर गेल्या होत्या. पाण्यात उतरताना त्यांचा पाय घसरल्याने त्या योजनेच्या मुख्य कालव्यात पडल्या. कालव्यात पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने व मदतीसाठी जवळ कोणीही नसल्याने त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्या.
कालव्यावर धुणे धुण्यासाठी आलेल्या मुलींना पाण्यातून कोणीतरी वाहत गेल्याचे लक्षात आले.त्यामुळे त्यांनी  आरडाओरडा सुरू केला.मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने काही क्षणातच भोंगाळे या दिसेनाशा झाल्या.
त्यानंतर युवकांनी पाण्यात उतरून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यावेळी त्या पडलेल्या जागेपासून अर्धा किलोमीटर लांब असलेल्या पुलाच्या पुढे सापडल्या.त्यांना पाण्यातून बाहेर काढले असता त्या मृत झाल्याचे आढळून आले.