Fri, Oct 02, 2020 00:52होमपेज › Sangli › सांगली : खलाटीत ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोना

सांगली : खलाटीत ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोना

Last Updated: Jun 03 2020 2:32PM

संग्रहित छायाचित्रजत : पुढारी वृत्तसेवा   

खलाटी (ता.जत) येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे चाचणी अंती स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी दिली आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेला हा आठवा व्यक्ती आहे. याबाबत अधिक माहिती अशी, बाधित व्यक्ती खलाटी येथील असून ट्रॅव्हल्स गाडीवर काम करत होता. चार दिवसांपुर्वी त्याला त्रास होऊ लागल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

सांगली जिल्ह्यात आणखी २ महिला पॉझिटिव्ह

जत पश्चिम भागात अंकलेनंतर खलाटीत हा रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या बाधिताच्या संपर्कात अनेक जण आल्याची माहिती समोर येत आहे. संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी  दाखल झाले आहेत.

 "