Tue, Sep 29, 2020 18:55होमपेज › Sangli › काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांना कोरोनाची लागण

काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांना कोरोनाची लागण

Last Updated: Aug 15 2020 4:28PM

संग्रहीत छायाचित्रकडेगाव (सांगली) : पुढारी वृत्तसेवा 

काँग्रेसचे जेष्ठ नेते, डॉ. पतंगराव कदम सोनहीरा साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. मोहनराव कदम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी युवा नेते डॉ. जितेश यांच्यासह आई, वडील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह होता. त्यानंतर आ. मोहनराव कदम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कडेगाव-पलूस मतदारसंघ हादरला आहे. आ. मोहनराव कदम यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते लवकरच कोरोनावर मात करून घरी परत येतील असा विश्वास कार्यकऱ्यांकडून व कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे. 

सांगली : सावळजमध्ये हवेत गोळीबाराचा थरार

दरम्यान, निकटच्या संपर्कातील कार्यकर्त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे तसेच लक्षणे दिसत असतील तर कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन कदम यांनी केले आहे.

 "