Tue, Sep 29, 2020 18:18होमपेज › Sangli › सांगली : सावळजमध्ये हवेत गोळीबाराचा थरार

सांगली : सावळजमध्ये हवेत गोळीबाराचा थरार

Last Updated: Aug 15 2020 3:50PM
तासगाव : पुढारी वृत्तसेवा

सावळज (ता. तासगाव) येथे कौटुंबिक वादातून एका निवृत्त सैनिकाने हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

कुंडलक हरिबा बनसोडे (रा. हरोली, ता. कवठे महाकाळ) असे संशयितांचे नाव आहे. याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बनसोडे यांची सासरवाडी डोगरसोनी आहे. पण सासरे दयानंद काटे हे कुटुंबासह सावळज (नवीन वसाहत) येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची मुलगी योगिनी हिचा संशयित कुंडलिक याच्या बरोबर काही वर्षा पूर्वी  विवाह झाला आहे. कुंडलिक हा निवृत्त सैनिक असून तो व्यसनाधीन असल्याने त्याचा पत्नीशी नेहमी वादावादी, भांडण, मारहाण करीत होता. यातूनच वादावादी होऊन गेल्या आठ दिवसांपूर्वी कुंडलिक याने पत्नी योगिनी हिला माहेरी आणून सोडले होते. त्यावेळीही कुंडलिक याने सासरे व मेहुणे यांच्याबरोबर वाद घालून तुमची मुलगी तुम्ही घरी ठेवून घ्या. मी तिला नांदवणार  नाही असे बजावून गेला होता.

शनिवारी सकाळी आकरा वाजता कुंडलिक हा सावळज येथे येऊन पुन्हा सासरे दयानंद यांच्याशी वाद घालू लागला. यातून वाद वाढत जाऊन कुंडलिक याने त्याच्या जवळ असणाऱ्या डब्बल बार बंदुकीतून दोन वेळा हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी जमाव गोळा झाल्याने जमवातील काहींनी धाडसाने पुढे होऊन कुंडलिक याच्या हातातील बंदूक कडून घेतली. याची माहिती तातडीने तासगाव पोलिसाना मिळताच पोलिसांनी संशयितास ताब्यात घेण्यात आहे.

 "