Wed, Jun 23, 2021 02:40
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ९४८ नवे रुग्ण : ३० बळी

Last Updated: Jun 11 2021 2:49AM

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गुरुवारी कोरोना 948  रुग्ण सापडले आहे. 815 जण कोव्हिडमुक्त झाले.  दिवसात 30 जणांचे बळी गेले. 1309 जण गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात आजअखेर एकूण   पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1 लाख 27 हजार 438  झाली    आहे.  सध्या  9  हजार 129 व्यक्ती उपचाराखाली आहेत.  आज दिवसभरात आरटीपीसीआरच्या   2903 तपासण्या करण्यात आल्या. यातील 365 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर 6643  जणांच्या अँटिजेन टेस्ट केल्या. यात 617 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय :  आटपाडी : 24, कडेगाव : 66, खानापूर : 48, पलूस : 85, तासगाव : 66, जत : 68, कवठेमहांकाळ : 71, मिरज :143,  शिराळा : 113, वाळवा :145 , सांगली शहर : 88, मिरज : 31.  

गेल्या काही       दिवसांपासून   मृत्यूचा   आकडा कमी होत चालला आहे.  आज सांगलीसह इतर जिल्ह्यातील 30   जणांचे बळी गेले. कडेगाव तालुक्यात 2, पलूस तालुक्यात 2,    तासगाव  तालुक्यात 1,   जत  तालुक्यात 1,      मिरज तालुक्यातील 6,  शिराळा तालुक्यात 3,  वाळवा तालुक्यात 4, सांगली 2, मिरज 1  अशा   22  व्यक्तींचा मृत्यू झाला.

तसेच   कर्नाटकामधील 2, कोल्हापूर जिल्ह्यातील 4, सातारा जिल्ह्यातील 2  अशा 8   जणांचा आज सांगलीत     उपचारादरम्यान मृत्यू झाला.  आजअखेर  एकूण 3671  व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.  

आज परजिल्ह्यातील सोलापूरमधून  आलेल्या  3 ,  कोल्हापूर जिल्ह्यातील  16,   सातारा        जिल्ह्यातील  4,   कर्नाटकमधील 11 अशा 34   पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.  होम आयसोलेशनमध्ये   7243 व्यक्ती आहेत.

1865 जणांचे जिल्ह्यात लसीकरण 

जिल्ह्यात आज  1865 लोकांचे लसीकरण झाले. आजअखेर जिल्ह्यातील एकूण सात लाख 35 हजार147 लोकांचे लसीकरण झाले आहे. लस जस-जशी येईल, त्याप्रमाणात लसीकरण सुरू ठेवले आहे, अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली.

म्युकर मायकोसिसचे एकूण 231 रुग्ण

म्युकर मायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात वाढू लागले आहेत. आज 2 नवे रुग्ण आढळून आले. एकूण 231 रुग्ण झाले आहेत. आजपर्यंत 14 जणांचा बळी या आजाराने घेतला आहे. 

आजअखेर तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह

 आटपाडी : 8189
 जत : 10823
 कडेगाव : 8732
 कवठेमहांकाळ : 6994
 खानापूर : 10334
 मिरज : 13786

  पलूस : 6394

 शिराळा : 7190
 तासगाव : 9846
 वाळवा : 16009
 महापालिका क्षेत्र : 29,141